भारतातील पंचवार्षिक योजना: संपूर्ण आढावा (१९५१-२०१७)
भारतीय नियोजनाचा संपूर्ण इतिहास: प्रारूपे, कालावधी आणि यश.
भारताच्या आर्थिक विकासात 'पंचवार्षिक योजनांचे' (Five Year Plans) योगदान महत्त्वपूर्ण आहे. १५ मार्च १९५० रोजी स्थापन झालेल्या 'योजना आयोगा'मार्फत (Planning Commission) या योजना राबवल्या गेल्या. १९५१ पासून सुरू झालेला हा प्रवास २०१७ मध्ये १२ व्या योजनेने थांबला आणि आता 'नीती आयोग' (NITI Aayog) ही जबाबदारी सांभाळत आहे.
(आकृती: भारतीय पंचवार्षिक योजनांचा कालक्रम)
सर्व पंचवार्षिक योजनांची सविस्तर यादी (Comprehensive List)
खालील तक्त्यात १ ते १२ योजना आणि त्यादरम्यान पडलेले खंड (Plan Holidays) यांची संपूर्ण माहिती दिली आहे:
(मोबाईलवर टेबल पूर्ण पाहण्यासाठी डावीकडे-उजवीकडे सरकवा / Scroll करा)
| योजना (Plan) | कालावधी (Duration) | प्रारूप / मॉडेल (Model) | प्रमुख उद्दिष्ट आणि विशेष (Key Focus) |
|---|---|---|---|
| पहिली योजना | १९५१ - १९५६ | हॅरोड-डोमर | कृषी आणि जलसिंचन. ही योजना यशस्वी ठरली. भाकरा-नांगल, हिराकुंड धरणे बांधली गेली. |
| दुसरी योजना | १९५६ - १९६१ | पी.सी. महालनोबीस | जड उद्योग (Heavy Industries). भिलाई, दुर्गापूर, राउरकेला पोलाद प्रकल्प सुरू. |
| तिसरी योजना | १९६१ - १९६६ | गाडगीळ योजना | स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था. (चीन युद्ध १९६२ आणि पाक युद्ध १९६५ मुळे ही योजना अपयशी ठरली). |
| योजना सुट्टी (Plan Holiday) | १९६६ - १९६९ | वार्षिक योजना | युद्ध आणि दुष्काळामुळे ३ वार्षिक योजना राबवल्या. याच काळात हरित क्रांती सुरू झाली. |
| चौथी योजना | १९६९ - १९७४ | अशोक रुद्र व मन्ने | स्थैर्य आणि स्वावलंबन. १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९६९). |
| पाचवी योजना | १९७४ - १९७८ | D.P. Dhar | 'गरीबी हटाओ' आणि स्वावलंबन. ही योजना वेळेआधीच (४ वर्षात) बंद केली. |
| सरकती योजना (Rolling Plan) | १९७८ - १९८० | गुन्नार मिर्डाल | जनता सरकारने पाचवी योजना रद्द करून ही योजना आणली. |
| सहावी योजना | १९८० - १९८५ | - | दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. |
| सातवी योजना | १९८५ - १९९० | वकील आणि ब्रह्मानंद | उत्पादन, रोजगार आणि अन्नधान्य. 'जवाहर रोजगार योजना' सुरू. |
| वार्षिक योजना (Annual Plans) | १९९० - १९९२ | - | आर्थिक संकटामुळे २ वर्षे वार्षिक योजना राबवल्या. १९९१ मध्ये LPG धोरण स्वीकारले. |
| आठवी योजना | १९९२ - १९९७ | राव-मनमोहन मॉडेल | मानव संसाधन विकास (HRD). नवीन आर्थिक धोरणाची अंमलबजावणी. |
| नववी योजना | १९९७ - २००२ | - | सामाजिक न्याय आणि समानतेसह वाढ (Growth with Social Justice). |
| दहावी योजना | २००२ - २००७ | - | पुढील १० वर्षात दरडोई उत्पन्न दुप्पट करणे. |
| अकरावी योजना | २००७ - २०१२ | - | जलद आणि अधिक समावेशक विकास (Inclusive Growth). |
| बारावी योजना | २०१२ - २०१७ | - | जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक विकास. (नीती आयोग आल्याने ही शेवटची योजना ठरली). |
महत्त्वाची प्रारूपे (Important Models)
- हॅरोड-डोमर (Harrod-Domar): पहिल्या योजनेत वापरले. आर्थिक वाढ ही बचतीचा दर आणि भांडवली गुंतवणुकीवर अवलंबून असते.
- महालनोबीस (Mahalanobis): दुसऱ्या योजनेत वापरले. जलद औद्योगिकीकरणासाठी भांडवली वस्तूंच्या (Capital Goods) उद्योगावर भर.
- राव-मनमोहन (Rao-Manmohan): १९९१ च्या आर्थिक संकटानंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे (LPG) मॉडेल.
अर्थशास्त्र उजळणी (Flashcards)
नीती आयोग (२०१५)
योजना आयोगाची जागा १ जानेवारी २०१५ रोजी 'नीती आयोगाने' (National Institution for Transforming India) घेतली.
योजना सुट्टी (Plan Holiday)
१९६६ ते १९६९ या तीन वर्षांच्या कालावधीत दुष्काळ आणि युद्धामुळे पंचवार्षिक योजना राबवता आली नाही, याला 'योजना सुट्टी' म्हणतात.
गरीबी हटाओ
इंदिरा गांधींनी पाचव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान (१९७४-७८) 'गरीबी हटाओ'ची घोषणा दिली होती.
सरकती योजना (Rolling Plan)
जनता पक्षाच्या सरकारने १९७८ मध्ये पाचवी योजना वेळेआधी संपवून 'सरकती योजना' सुरू केली होती.
सराव प्रश्न (MCQs)
प्रश्न १: भारताची 'दुसरी पंचवार्षिक योजना' कोणत्या प्रारूपावर (Model) आधारित होती?
उत्तर पहा
प्रश्न २: कोणत्या पंचवार्षिक योजनेला 'योजना सुट्टी' (Plan Holiday) असे म्हटले जाते?
उत्तर पहा
प्रश्न ३: 'गरीबी हटाओ' ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य वैशिष्ट्य होते?
उत्तर पहा
हा सविस्तर ब्लॉग पोस्ट अभ्यासासाठी नक्की शेअर करा!

0 Comments