Advertisement

अर्थशास्त्राचा अर्थ

अर्थशास्त्राचा अर्थ

अर्थशास्त्राचा अर्थ

अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ‘अर्थशास्त्र’ (Economics) हा शब्‍द मूळ ग्रीक शब्द ‘ऑइकोनोमिया’ (OIKONOMIA) यापासून आला आहे. याचा अर्थ ‘‘कौटुंबिक व्यवस्‍थापन’’ असा आहे.

पॉल सॅम्‍युल्सन यांनी अर्थशास्‍त्राचे वर्णन ‘सामाजिक शास्‍त्रांची राणी’ असे केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्‍यासाशी निगडित आहे. या शास्‍त्रातून मानव आपल्‍या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे.

अर्थशास्त्राच्या व्याख्या :

१) ॲडम स्‍मिथ यांची संपत्‍ती संबंधित अर्थशास्‍त्राची व्याख्या :

ॲडम स्‍मिथ यांना सनातनवादी अर्थशास्‍त्रज्ञ तसेच ‘‘अर्थशास्त्राचे जनक’’ असे मानले जाते. त्‍यांनी अर्थशास्‍त्राची संपत्‍तीविषयक व्याख्या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्‍या ‘राष्‍ट्राची संपत्‍ती’ (''An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations.'') या ग्रंथात मांडली. ॲडम स्‍मिथ यांच्या मते, 
‘‘ अर्थशास्त्र हे संपत्‍तीचे शास्‍त्र आहे.’’ 

२) प्रा. अल्फ्रेड मार्शल यांची कल्‍याणकारी अर्थशास्‍त्राची व्याख्या :

 प्रा. आल्‍फ्रेड मार्शल यांनी कल्‍याणकारी अर्थशाश्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशाश्त्राची असून त्‍यांनी ‘‘अर्थशाश्त्राची मूलतत्त्‍वे’’ (Principles of Economics) हे पुस्‍तक १८९० साली प्रकाशित केले.

आल्‍फ्रेड मार्शल यांच्या मते 
‘‘अर्थशास्त्र हे मानवी कल्‍याणाचा अभ्‍यास करणारे शास्‍त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व अावश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्‍यास केला जातो.’’

३) लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्‍त्राची व्याख्या :

अर्थशाश्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी १९३२ साली ‘‘अर्थशास्‍त्राचे स्‍वरूप व महत्‍त्‍व’’ (An Essay on the Nature and Significance of Economic Science) हे पुस्‍तक प्रकाशित केले. यात त्‍यांनी अर्थशाश्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सागिंतली.

‘‘अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्‍यास करणारे शास्‍त्र म्‍हणजे अर्थशास्‍त्र होय’’.

Post a Comment

0 Comments